Chandrapur : बल्लारशहा रेल्वे स्थानकातील पुलाचा स्लॅब कोसळला; दुर्घटनेत 20 प्रवासी जखमी

चंद्रपूर – चंद्रपुर येथील बल्लारशहा रेल्वे स्थानकात पुलाचा स्लॅब कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. रेल्वे स्थानकातील फूट ओवर ब्रिजचा एक भाग अचानक कोसळल्याने 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेल्वे ट्रॅकवरुन कोणतीही रेल्वे जात नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बल्लारशाह रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरून 4 क्रमांक कडे प्रवासी या पुलावरून जात होते. तेव्हा दुपारच्या सुमारास या पादचारी पूलाचा एक भाग अचानक कोसळला. त्यामुळे 60 फूट उंचीवरून प्रवासी थेट रेल्वेच्या रुळावर पडले.
या दुर्घटना माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर रेल्वे प्रवाशांनी, रेल्वे कर्मचारी आणि जीआरपी जवानांनी मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. तर, 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेनंतर नागरिकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
दरम्यान, हा फूट ओवर ब्रिज नेमका किती वर्षे जुना होता? त्याची देखभाल व्यवस्थित होत होती की नाही? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तसेच हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला याबाबतही अद्याप अधिक माहिती समजू शकली नाही.





