Portable MRI Machine : एम्समध्ये देशातील पहिले पोर्टेबल एमआरआय मशीन सुरु
देशातील आरोग्यसेवेत महत्त्वाचा टप्पा गाठत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायनन्सेस (एम्स) (Portable MRI Machine) येथे भारतातील पहिले पोर्टेबल एमआरआय मशीन सुरू करण्यात आले आहे.

Portable MRI Machine : देशातील आरोग्यसेवेत महत्त्वाचा टप्पा गाठत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायनन्सेस (एम्स) (Portable MRI Machine) येथे भारतातील पहिले पोर्टेबल एमआरआय मशीन सुरू करण्यात आले आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता गंभीर रुग्णांची मेंदू तपासणी थेट त्यांच्या बेडशेजारीच (Portable MRI Machine) करता येणार असून उपचार प्रक्रियेत मोठी सुलभता आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामान्यत: एमआरआय स्कॅनसाठी रुग्णाला विशेष कक्षात हलवावे लागते.
विशेषत: आयसीयूमध्ये दाखल असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर (Portable MRI Machine) असलेल्या रुग्णांना हलवणे धोकादायक ठरू शकते.
अशा परिस्थितीत नव्याने सुरू करण्यात आलेले पोर्टेबल एमआरआय मशीन मोठा दिलासा देणारे ठरत आहे. हे उपकरण थेट रुग्णाच्या बेडपर्यंत नेऊन तपासणी करता येते, ज्यामुळे रुग्ण हलवण्याची गरजच राहत नाही.






