सैफ अली खानच्या ‘रेस ४’मध्ये दिसणार बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री

Saif Ali Khan ‘Race 4’ | अभिनेता सैफ अली खान लवकरच ‘रेस ४’ चित्रपटात दिसणार आहे. रेस फ्रॅंचाईजीच्या चौथ्या भागाची निर्माते रमेश तौरानी यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. यात सैफ अली खानसह बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाचं फार उत्सुकता लागली आहे.
यातच आता या चित्रपटातील एक अपडेट समोर आले आहे. यात आता नायिका म्हणून कोणाला पाहायला मिळणार ह्याची सध्या चर्चा सुरू होती. यावरून आता पडदा उठवला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची ‘रेस ४’ मध्ये वर्णी लागली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. समजा, ही माहिती सत्य असली तर सैफ अली खान, रुकुल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे त्रिकुट चित्रपटात एकत्र पाहायला मिळणे, चाहत्यांसाठी एक वेगळी पर्वणी असेल. Saif Ali Khan ‘Race 4’ |
View this post on Instagram
रकुल प्रीत सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘मेरे हसबैंड की बीवी’ या चित्रपट रकुल दिसली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला नाही. पण या चित्रपटाला रकुल आणि अर्जुन कपूरची जोडी आवडली होती. या चित्रपटात भुमी पेडणेकर आणि स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल देखील पाहायला मिळाले होते.
हेही वाचा:





