Rakesh Bapat: राकेश बापटच्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री
Rakesh Bapat: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद

Rakesh Bapat: अभिनेता राकेश बापट ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे अभिनेत्री सायली साळुंखे ‘इरा’या भूमिकेत मालिकेत पाहायला मिळणार आहे. धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची इरा तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली, ‘इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय.’
पुढे ती म्हणाली, ‘आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सुर असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. हा बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. तुझ्याकडे तुला मागणेच्या निमित्ताने ही संधी चालून आली,’ असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला.
View this post on Instagram
दरम्यान, सायली साळुंखेने यापूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय हिंदी मालिकाविश्वातही तिने गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
प्रोमोमध्ये राकेश एका ‘सिंगल फादर’च्या भूमिकेत दिसत असून, ईशानचा बाबाही मीच आणि आईसुद्धा मीच, असा एक भावनिक डायलॉगही ऐकायला मिळत आहे. या मालिकेत बालकलाकार क्रियान पेडणेकर हा त्याच्या ऑनस्क्रीन मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा:






