Aneet Padda: अनीत पड्डाचा नवा लूक पाहून चाहते झाले फिदा; ‘हुंकार’च्या रिलीजआधी अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत
Aneet Padda आता अनीत तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे पुन्हा चर्चेत आहे. ‘हुंकार’नंतर ती ‘शक्ति शालिनी’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचे लक्ष तिच्या आगामी कामांकडे लागले आहे.

Aneet Padda: अभिनेत्री अनीत पड्डा सध्या तिच्या आगामी वेब सीरीज ‘हुंकार’मुळे चर्चेत आहे. या सीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, अनीत सध्या सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान तिने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा वेगळा आणि आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. अनीतच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनीत पड्डाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने केस मोकळे ठेवले असून, साधा पण स्टायलिश लूक केला आहे. काळ्या रंगाच्या जुत्तीमुळे तिच्या लूकला वेगळा टच मिळाला आहे. तसेच तिने हलकी ज्वेलरी घातली आहे. एकूणच तिचा हा लूक साधा असूनही लक्ष वेधून घेणारा आहे.
अनीतने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त गुलाबाच्या फुलाचा इमोजी वापरला आहे. फोटो पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. एका यूजरने तिच्या आउटफिटची विशेष प्रशंसा केली. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘हे भगवान, बहुत खूबसूरत’ अशी कमेंट केली.

Aneet Padda shares new photos
एका यूजरने अनीतला ‘बार्बी डॉल’ अशी उपमा दिली आहे. तर आणखी एका चाहत्याने तिच्या फोटोवर मजेशीर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. त्यामुळे अनीतची ही नवी पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, अनीत पड्डा सध्या ‘हुंकार’ या वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सीरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. सीरीजमध्ये अनीत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरनुसार, ती एका प्रभावशाली व्यक्तीविरोधात आवाज उठवताना दिसते.

Aneet Padda shares new photos
या सीरीजमध्ये अनीतसोबत अभिनेत्री फातिमा सना शेखदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. फातिमा या सीरीजमध्ये एका प्रकरणाची चौकशी करताना दिसणार आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद जीशान अय्यूब, अर्जुन माथुर, रघुबीर यादव आणि राम कपूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
अनीत पड्डाच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून काम केलं आहे. मात्र, ‘सैयारा’ या चित्रपटामुळे तिला मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात ती अभिनेता अहान पांडे याच्यासोबत दिसली होती. चित्रपटातील तिच्या कामाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
आता अनीत तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे पुन्हा चर्चेत आहे. ‘हुंकार’नंतर ती ‘शक्ति शालिनी’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचे लक्ष तिच्या आगामी कामांकडे लागले आहे.
अनीत पड्डाची ‘हुंकार’ ही वेब सीरीज २५ सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. सीरीजच्या रिलीजआधी तिच्या नव्या लूकची चर्चा होत असल्याने आता ‘हुंकार’ला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





