Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

पोप लिओ यांनी पोप पदाचा आपला पहिला अधिकृत दौरा पियाझ्झामधून सुरू केला. पोप यांचा जागतिक समुदायाशी संपर्क आणि मध्यस्थी करणारा हा एक धार्मिक विधी समजला जातो. ट्रकच्या मागील भागात उभे राहून पोप लिओ यांनी समुदायाला अभिवादन केले.
शपथविधीच्यावेळी पोप यांच्या खांद्यावर लोकरी शाल आणि बोटात मच्छिमारांची अंगठी घालण्याच आली. गजभरातील १.४ अब्ज चर्चची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याचे हे निदर्शक प्रतिक आहे.
माजी पोप फ्रान्सिस यांची अखेरची भेट ज्यांच्याबरोबर झाली होती, ते अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.वान्स शिष्टमंडळासह शिकागो येथून पोप लिओ यांच्या सूत्रे स्वीकारण्याच्या समारंभाला उपस्थित राहिले होते.
नूतन पोप यांचा जागतिक ऐक्याचा संदेश
आपल्या पहिल्या भाषणात पोल लिओ यांनी आपण विश्वासू लोकांचे चाकर असल्याची भावना व्यक्त केली. आजच्या जगात द्वेषभावनेमुळे झालेले खूप मतभेद, खूप जखमा अजूनही आहेत.
द्वेष, हिंसाचार, पूर्वग्रह, मतभेदाची भीती आणि पृथ्वीच्या संसाधनांचे शोषण करणारा आणि सर्वात गरीबांना दुर्लक्षित करणारा आर्थिक आदर्श देखील आहे..अमेरिका आणि त्यापलीकडे कॅथोलिक चर्चमधील ध्रुवीकरण लक्षात घेता त्यांनी ऐक्यासाठी केलेले आवाहन महत्त्वपूर्ण होते.





