गरीब हूँ, गैर जिम्मेदार नहीं

शिरूर -सध्या सोशल मीडियावर तोंडाला घरगुती कापडापासून बनवलेला मास्क घातलेल्या एका लहान मुलाने करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून तोंडाला लावलेला हात शिलाईचा मास्क सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मास्क जैसा ही बनाया है, मॉं ने बनाया है! गरीब आहे साहेब, गैर जिम्मेदार नहीं। यातून या मुलाच्या गरिबीचे नव्हे; त्या जबाबदारीचे भान दिसून येत आहे.
सध्या करोना आजाराने संपूर्ण राज्यात नव्हे; तर जगात धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकाने मास्क वापरावे म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपली नव्हे तर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, मास्क वापरा असे शासन सांगूनही नागरिक ऐकत नाहीत. यासाठी प्रशासनाला मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आली असताना.
एक गरीब कुटुंबातील मुलगा घरातील फाटक्या कपड्याचे हात शिलाईचे मास्क त्याच्या आईने तयार करून तोंडाला बांधून उभा आहे. त्याला आणि त्याच्या आईला गरीब झोपडीत राहत असून करोनाव्हायरस आजाराची गंभीरता आहे व शासनाने सांगितलेले मास्क वापरा याची जबाबदारीही पाळत आहे. परंतु शहाण्या नागरिकांना आपल्या जबाबदारीचे भान नाही. त्यामुळे या गरीब मुलाकडून काहीतरी शिका असे म्हणण्याची वेळ आली आहे.





