Pooja Sawant : अखेर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! कोण आहेत मिस्टर हॅंडसम….

Pooja Sawant : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतचे (Pooja Sawant) नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. तिची अभिनेता वैभव तत्ववादी याच्यासोबत नात्याचीही अनेकदा चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र त्या चर्चा नेहमीच खोट्या ठरल्या. त्यानंतर आता स्वत: पूजाने तिच्या तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला आहे. पूजाने काही फोटो शेअर करत प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. या पोस्टनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
पूजाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूजा सावंतचा लाईफ पार्टनर नेमका आहे कोण? हे स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान या दोघांपैकी कोणतरी एक असेल अश्या चर्चा होताना दिसत होत्या.
मात्र, आता पूजाने आपल्या सहजीवनातील जोडीदाराचे फोटो पोस्ट केले आहेत. अत्यंत स्टायलिश असे फोटो तिने शेअर करून आपण सिद्धेश चव्हाणशी (Siddhesh Chavan) लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगितले आहे. इतक्या वर्षानंतर पूजाचा जोडीदार आता समोर आला असून, नेटकरी यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळत आहे.





