पूजा सावंतने चाहत्यांना दिले सरप्राइज; बॉलीवूड अभिनेत्यासोबत केले काम

Pooja Sawant : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजा सावंतने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र आता पूजा लग्नाआधीच मोठे सरप्राईज दिले आहे. पुन्हा एकदा पूजा बॉलीवूडमध्ये झळकणार आहे.
‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने पूजा बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. ‘रॉम रॉम’ असं या गाण्याचं नाव असून नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात ती अभिनेता विद्युत जामवालबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. यापूर्वी जंगली’ चित्रपटाच्या निमित्ताने पूजाने विद्युत जामवालसोबत काम केले होते. आता पुन्हा या दोघांची केमेस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
पूजा सावंतने यापूर्वी ‘जंगली’ चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये काम केलं होतं. यामध्ये तिला अभिनेता विद्युत जामवालबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा ‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने पूजा बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. ‘रॉम रॉम’ असं या गाण्याचं नाव असून नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पूजाने या गाण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकरी यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने उत्तम भूमिका साकारली आहे. नुकतीच ती ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली आहे.





