पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे खास व्यक्ती?

Pooja Sawant : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतचे (Pooja Sawant) नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. तिची अभिनेता वैभव तत्ववादी याच्यासोबत नात्याचीही अनेकदा चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्या चर्चा नेहमीच खोट्या ठरल्या. त्यानंतरआता स्वत: पूजाने तिच्या तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला आहे. पूजाने काही फोटो शेअर करत प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. या पोस्टनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
पूजाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अद्याप ही पूजा सावंतचा लाईफ पार्टनर नेमका आहे कोण? हे स्पष्ट झालेले नाही. पूजाने शेअर केलेल्या फोटोत तिनं तिच्या पार्टनरचा चेहरा जरी दाखवलेला नसला तरी एका फोटोत तिनं तिची हिऱ्याची अंगठी फ्लॉंट केली आहे. त्यामुळे आता पूजा सावंत देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
हे फोटो पोस्ट करुन पूजा लिहीते, “माझ्या खास व्यक्तीसोबत एका नवीन अध्यायासाठी मी तयार आहे… ही आहे प्रेमाची जादू आणि आपल्या पुढच्या सुंदर प्रवासासाठी… आमच्या सोबत रहा.” असं कॅप्शन देत पूजा सावंतने हा खुलासा केला आहे. मात्र पूजा सावंतच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन कोण? याची उत्सुकता लागली आहे. मात्र त्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावे लागेल असे दिसत आहे.
दरम्यान, पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने पुढे ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘झकास’ यासारखे अनेक मराठी चित्रपटकाम केले. इतकेच काय तर तिने ‘जंगली’ या बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे.





