Political News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ 2 बड्या नेत्यांनी सोडली साथ
उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा रणसंग्रामाचे पडघम आतापासूनच वाजू लागले असताना, राज्याच्या राजकारणात (Political News) एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडू लागल्या आहेत.

Political News : उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा रणसंग्रामाचे पडघम आतापासूनच वाजू लागले असताना, राज्याच्या राजकारणात (Political News) एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडू लागल्या आहेत. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी तीव्र केली असताना, लखनौमधील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात अशा हालचाली घडल्या ज्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली.
पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या आणि मातब्बर नेत्यांनी थेट ‘सायकल’वर स्वार होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मुरादाबाद नगर मतदारसंघातील राजकीय समीकरणे एका झटक्यात बदलून टाकणारा हा पक्षप्रवेश (Political News) ठरला असून, सध्यातरी सपाने या जागेवर अधिकृत उमेदवाराची घोषणा गुलदस्त्यात ठेवली आहे.
या राजकीय नाट्यात सर्वात मोठा धक्का बसला तो भाजपचे माजी आमदार आणि अनुभवी नेते राजीव चन्ना (खन्ना) यांच्या पक्षांतराने. २००७ मध्ये मुरादाबाद पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवणारे चन्ना हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मुरलेले नाव मानले जातात.
त्यांच्यासोबतच भवानी शुक्ला यांनी आपल्या पाचही मुलांसह श्रीकृष्ण भगवान शुक्ला, शिव भगवान शुक्ला, शंकर भगवान शुक्ला, विष्णू भगवान शुक्ला आणि राम भगवान शुक्ला सपाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी पक्ष कार्यालयात ‘जय भवानी, जय अखिलेश’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
दुसरीकडे, एकेकाळी सपातून भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते मनमोहन सैनी यांनी पुन्हा स्वगृही परतत भाजपला आणखी एक दणका दिला. २०१२ मध्ये ठाकूरद्वारा मतदारसंघातून सपाकडून निवडणूक लढवल्यानंतर ते भाजपवासी झाले होते, मात्र आता त्यांची झालेली ही घरवापसी (Political News) मुरादाबाद आणि आसपासच्या पट्ट्यात राजकीय उलथापालथ घडवून आणणारी ठरणार आहे.






