Political News : बीजेडीला राजकीय धक्का ! ‘या’ खासदाराचा तडकाफडकी राजीनामा
बिजू जनता दल (बीजेडी) चे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा (Political News) आणि राज्यसभा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Political News : बिजू जनता दल (बीजेडी) चे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा (Political News) आणि राज्यसभा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सामंतराय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची (Political News) घोषणा केली. पक्षात सातत्याने होत असलेले दुर्लक्ष आणि आपली प्रतिमा मलिन करण्याचा सुरू असलेला पद्धतशीर प्रयत्न यामुळेच आपण हा कठीण निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन पटनायक यांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये सामंतराय यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत त्यांनी सेवा, संघटन आणि समर्पण या तत्त्वांचे पालन करत पूर्ण निष्ठेने काम केले. मात्र, आता पक्षाला आपल्या सेवेची गरज उरलेली नाही असे वाटल्याने जनहितार्थ त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ବିଜୁ ଜନତା ଦଳର ମାନ୍ୟବର ସଭାପତି ଶ୍ରୀ @Naveen_Odisha ଙ୍କୁ ମୋର ଇସ୍ତଫା ପତ୍ର। ଦଳ ପ୍ରତିଷ୍ଠା ହେବାଠୁଁ ଆଜି ଯାଏଁ ମୁଁ ମୋର ସେବା, ସଂଗଠନ ଓ ସମର୍ପଣ ନୀତିରେ କାର୍ଯ୍ୟ କରି ଆସିଛି। ଆଗକୁ ମଧ୍ୟ ଓଡିଶାବାସୀଙ୍କ ପାଇଁ ମୋର ସଂଘର୍ଷ ଜାରି ରଖିବି। ଜୟ ଜଗନ୍ନାଥ 🙏 pic.twitter.com/Qfgy16PbLl
— Debashish Samantaray (@debashish_mla) May 25, 2026
आपल्याला राज्यसभेवर पाठवून अविभाजित कटक जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्याची आणि ओडिशाचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पटनायक यांचे आभार मानले असून, भविष्यातही ओडिशाच्या जनतेसाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, देबाशीष सामंतराय यांच्या राजीनाम्यानंतर (Political News) ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि सामंतराय यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते रवींद्र नारायण बेहरा यांनी बीजेडीवर जोरदार निशाणा साधला.
ओडिशामधील राजकीय वातावरण आता बदलू लागले असून बीजेडीच्या विकेट्स एक-एक करून पडत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच बीजेडीचे सरकार हे नेहमीच दादागिरी आणि गुंडगिरीसाठी ओळखले गेले, अशी टीकाही त्यांनी केली. या विधानानंतर सामंतराय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात अधिकच तीव्र झाल्या आहेत.






