Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात याचिका दाखल
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
न्या. स्वर्णा कांता शर्मा यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे ही कारवाई केली आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंग, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांच्या विरोधात न्यायालयाने अवमानाची याचिका दाखल केली आहे.
दिल्लीतील वादग्रस्त अबकारी धोरण प्रकरणातील काही संशयित आरोपी आणि इतरांनी समाज माध्यमांवर न्या. स्वर्णा कांता शर्मा यांच्याबाबत बदनामीकारक आणि अपमानजनक वक्तव्य केले आहे.
संशयितांचे हे फौजदारी स्वरूपाचा न्यायालयाचा अवमान या व्याख्येत बसते, असे निरीक्षण नोंदवत न्या. शर्मा यांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह आपच्या नेत्याविरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. दरम्यान, न्या. शर्मा यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, असा युक्तिवाद करत केजरीवाल यांनी शर्मा यांना हटविण्याची मागणी केली होती.






