Navnath Ban VS Ravindra Dhangekar : वार पलटवारामुळे राजकारण तापलं! नवनाथ बन यांच्या आरोपांवर रवींद्र धंगेकरांचं जोरदार प्रत्युत्तर म्हणाले…
Navnath Ban VS Ravindra Dhangekar : शातच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले असून थेट रवींद्र धंगेकरांवर गंभीर आरोप करत धंगेकरांना पक्षात कोण विचारत? अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली आहे. आता रवींद्र धंगेकरांनी देखील जशास तशा शब्दांत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Navnath Ban VS Ravindra Dhangekar : विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये २ जागेवर महायुतीला विजय मिळण्यात यश आले. आता पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. अशातच भाजप आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपच्या वाट्याला पराभव आला तर शिक्षक मतदार संघातून विजय मिळाला. अशातच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले असून थेट रवींद्र धंगेकरांवर गंभीर आरोप करत धंगेकरांना पक्षात कोण विचारत? अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली आहे. आता रवींद्र धंगेकरांनी देखील जशास तशा शब्दांत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर आरोप
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आरोप केला की, “पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नसतानाही रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या विरोधातील उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे संकेत देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या. धंगेकर यांनी भाजपच्या विरोधातील उमेदवाराचा प्रचार केला नसता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वेळीच समज दिली असती, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.” असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नव्हता. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एकापाठोपाठ तीन पोस्ट केल्या. त्यातील एका पोस्टमध्ये त्यांनी ‘शाब्बास पदवीधरांनो, योगेश जाधव आता तरी तुम्ही बोध घेणार का?’ असा सवाल उपस्थित केला होता.
धंगेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बन यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
‘भाजपला बाजूला केलं तर नवनाथ बन यांना कोण ओळखतं?’
नवनाथ बन यांच्या आरोपांना रवींद्र धंगेकर जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले. भाजपला बाजूला केले, तर नवनाथ बन यांना कोण ओळखणार, असा प्रतिप्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला. बन यांनी आपल्यावर टीका करण्याऐवजी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे, असे म्हणत त्यांचे कान टोचले.
धंगेकर म्हणाले की, “त्यांनी आपली भूमिका यापूर्वीही उघडपणे मांडली होती. भाजपने उमेदवारी दिलेल्या उमेदवाराच्या पक्षीय पार्श्वभूमीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अचानक आणलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला, मग आता पराभवानंतर आरोप का केले जात आहेत.”
Akshay Kumar: अक्षय कुमार तिसऱ्यांदा ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन





