Natural Gas Discovery in india : भारतासाठी आनंदवार्ता! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; व्हिडिओ आला समोर
Natural Gas Discovery in india : अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडल्याने देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे.

Natural Gas Discovery in india : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थिती आणि संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडल्याने देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे.
ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रातील खोल भागात नैसर्गिक गॅसचा नवा साठा शोधून काढला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या शोधाची माहिती दिली. त्यांनी एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा शोध भारताच्या खोल समुद्री ऊर्जा संशोधन मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
याआधी 2025 मध्ये विजयापुरम-2 या विहिरीतही नैसर्गिक गॅसचा शोध लागला होता. त्या गॅसमध्ये सुमारे 87 टक्के मिथेन आढळले होते, जे व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचे मानले जाते. सलग दोन यशस्वी शोधांमुळे अंदमान बेसिनकडे आता संभाव्य ऊर्जा केंद्र म्हणून पाहिले जात आहे.
Congratulations @OilIndiaLimited !
An ocean of energy opportunities reinforced in the Andaman Sea!
Very happy to report the presence of natural gas in Sri Vijayapuram-3 an exploratory well drilled by Oil India Ltd. 15 km off the east coast of the Andaman Islands at a water… pic.twitter.com/j6QvWqZkFx— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) June 5, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘समुद्र मंथन’ मिशनअंतर्गत हे संशोधन सुरू असून, खोल समुद्रातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मिशनअंतर्गत भारताच्या सागरी खोऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने Deep Water आणि Ultra Deep Water संशोधन विहिरी खोदण्याचे नियोजन आहे. जेणेकरून आपले हायड्रोकार्बन साठे पूर्णपणे वापरता येतील.
भारत सध्या आपल्या 90% हून अधिक कच्चे तेल आयात करतो. नैसर्गिक वायूचाही मोठा भाग आयात होतो. त्यामुळे देशांतर्गत हायड्रोकार्बन साठे शोधणे ही ऊर्जा सुरक्षेची सर्वात मोठी गरज आहे.
हेही वाचा : Baby Do Die Do: लाल छत्री, रहस्यमय हत्या आणि हुमा कुरेशी; ‘बेबी डू डाय डू’चा व्हिडिओ प्रदर्शित
सध्या भारत नैसर्गिक वायूच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. मात्र, या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढून आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. सरकारने 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा 15 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अंदमान समुद्र परिसरात सुमारे 371 दशलक्ष टन हायड्रोकार्बन संसाधने असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या साठ्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यासाठी आणखी चाचण्या आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे.
या शोधाबाबत हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, अंदमान बेसिनमध्ये हायड्रोकार्बनचा शोध लागणे हे या प्रदेशाच्या क्षमतेवरील दीर्घकालीन विश्वासाला मिळालेली पुष्टी आहे. म्यानमार ते इंडोनेशियापर्यंतच्या क्षेत्रात लागलेल्या शोधांशीही हे सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असला तरी भविष्यात भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने तो एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Salon Rate Hike : महागाईचा ‘हेअरकट’! महाराष्ट्रात सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली





