Vijay Vadettiwar : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. यामुळे राजकारण तापले असून, जिल्हा परिषद निवडणुकानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यावर काही नेते आक्षेप देखील नोंदवित आहेत. तर अजित पवार यांच्या मृत्यूमागे संशय देखील व्यक्त केला जात आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ नये म्हणून कट शिजला आणि त्यातूनच ठिणगी पडल्याचा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. खरंतर अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी आपल्याला शपथविधीबाबत कल्पना नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत भाष्य करताना दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती, असा मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणावरून आरोप आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील विलीनीकरणाबाबत बैठका झाल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या निधानाअगोदर १७ जानेवारीला एक बैठक झाली होती. या बैठकीत शरद पवारासंह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाबाबत अजितदादांनी आमच्याशी चर्चा केली नसल्याचे म्हटले होते. अजित दादांच्या मृत्यूपाश्चात विलीनीकरणाबाबत नवीनवी माहिती समोर येत आहे. या सगळ्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून कट कारस्थान असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने यावर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Jay Pawar on Ajit Pawar : ‘डॅड… काश वेळ थांबली असती’; जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावुक पोस्ट