Political News : दिल्लीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना अटक; राजकीय वातावरण तापलं
Political News : भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Political News : भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या विरोधात दिल्लीतील किसान घाट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान महापंचायती’दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. ‘देश बचाओ मोर्चा’च्या नेतृत्वाखाली विविध राज्यांतील शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून, दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक शेतकरी नेत्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Political News)
महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनाही दिल्लीत पोहोचल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक शेतकरी नेत्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणी रोखण्यात आल्याची माहिती आहे. (Political News)
दरम्यान, पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू बॉर्डरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि सिमेंट ब्लॉक्स उभारण्यात आले आहेत. किसान घाट परिसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (Political News)
शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेतील अनुदानित कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर येतील. त्यामुळे देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर करार मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. (Political News)
Political News : ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा





