Political News : शिंदेच्या ‘या’ नगरसेवकाचे पद रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय वातावरण नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेमुळे (Political News) चांगलेच तापले आहे.

Political News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय वातावरण नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेमुळे (Political News) चांगलेच तापले आहे. म्हात्रे यांच्यावर दाखल झालेल्या अनर्हतेच्या याचिकेवर आता थेट राज्य सरकारकडून १ जून रोजी दुपारी १२:३० वाजता सुनावणी होणार आहे.
‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६’ अंतर्गत ही कारवाई (Political News) सुरू असून, या सुनावणीकडे कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षबदलाचा आणि व्हीप उल्लंघनाचा गंभीर आरोप
ही याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक व गटनेते उमेश धोंडू बोरगांवकर यांनी जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून दाखल केली आहे. याचिकेत करण्यात आलेले मुख्य आरोप खालीलप्रमाणे आहेत
पक्षांतर
मधुर म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यांनी १६ मार्च २०२६ रोजी मूळ पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत राजीनामा न देता थेट शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
नियमबाह्य वर्तन
महापालिकेच्या महासभेत (आमसभा) ते मूळ पक्षाला ठरवून दिलेल्या आसनावर न बसता, सत्ताधारी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बाकावर जाऊन बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कायद्याचा बडगा
मूळ पक्षाच्या आदेशाविरुद्ध कृती केल्यामुळे ‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६’ च्या कलम ३(१)(अ) नुसार मधुर म्हात्रे यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी याचिकाकर्त्यांनी (Political News) केली आहे.
सुनावणीच्या वेळ आणि ठिकाणात बदल
या संवेदनशील प्रकरणावर यापूर्वी २५ मे रोजी सुनावणी होणार होती आणि तशी नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, काही प्रशासकीय कारणास्तव या सुनावणीचे ठिकाण आणि वेळ बदलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता ही महत्त्वाची सुनावणी मुंबईतील जुने सचिवालय, एम. जी. रोड, काला घोडा, फोर्ट येथे पार पडणार आहे.
सर्वांचे लक्ष सुनावणीच्या निर्णयाकडे
राज्य शासनाने संबंधित नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यासह याचिकाकर्ते उमेश बोरगांवकर आणि जिल्हाप्रमुख शरद पाटील यांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
१ जून रोजी होणाऱ्या या हाय-प्रोफाईल सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकार म्हात्रे यांच्या नगरसेवक पदाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या निर्णयाचे महापालिकेतील सत्ता समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.





