Political News : ऑपरेशन टायगरनंतर राज्यात ‘ऑपरेशन मांजर’ राबवणार; शिंदेवर सोपवली मोठी जबाबदारी
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Political News) पुन्हा एकदा एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यात यापूर्वी झालेली 'ऑपरेशन लोटस' आणि 'ऑपरेशन टायगर'ची नाट्यमय घडामोड जनतेने अनुभवली आहे.

Political News : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Political News) पुन्हा एकदा एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यात यापूर्वी झालेली ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर‘ची नाट्यमय घडामोड जनतेने अनुभवली आहे.
मात्र, आता या दोन्ही ऑपरेशननंतर राज्यात ‘ऑपरेशन मांजर’ सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या नव्या ऑपरेशनमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा पूर्णपणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे ‘ऑपरेशन मांजर’?
सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, विरोधी तसेच इतर राजकीय पक्षांमधील (Political News) महत्त्वाच्या आमदार आणि खासदारांना आपल्या गोटात खेचण्यासाठी (फोडण्यासाठी) हे विशेष ऑपरेशन आखण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या संपूर्ण मोहिमेची आणि ‘ऑपरेशन मांजर’ची मोठी जबाबदारी थेट केंद्राकडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजते.
रवी राणा यांच्या पक्षाचा होणार वापर?
या मोहिमेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘ऑपरेशन मांजर’ यशस्वी करण्यासाठी अपक्ष आमदार रवी राणा यांच्या ‘युवा स्वाभिमानी पक्षा’चा प्रामुख्याने वापर केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पक्षाच्या माध्यमातून इतर पक्षांतील नाराज किंवा इच्छुक लोकप्रतिनिधींना गळाला लावण्याची रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक मोठे राजकीय भूकंप झाले आहेत. सत्तांतराची नवनवीन समीकरणे महाराष्ट्राने (Political News) पाहिली आहेत. आता या नव्या ‘ऑपरेशन मांजर’च्या वृत्ताने राजकीय वर्तुळातील वातावरण कमालीचे तापले असून, “आता पुढचा नंबर कोणाचा?” याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. सूत्रांची ही माहिती जर खरी ठरली, तर आगामी काळात राज्यात पुन्हा एकदा मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळू शकते.






