Uddhav Thackeray : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल; ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडली असून पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे वृत्त आहे.

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडली असून पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे वृत्त आहे.
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या असून, हा ठाकरे गटासाठी (Uddhav Thackeray) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ ३ खासदार शिल्लक राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बैठकीतील अनुपस्थितीने संशय बळावला होता
काही दिवसांपूर्वी रविवारी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित ५ खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा पक्षाकडून (Uddhav Thackeray) करण्यात आला होता. परंतु, तेव्हापासूनच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत खासदारांमध्ये फूट पडल्याची कुजबूज सुरू झाली होती. आता ६ खासदारांनी बंड केल्याचे उघड झाले असून ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
‘मातोश्री’वर घडामोडींना वेग
खासदार फुटल्याची माहिती समोर येताच ‘मातोश्री’ निवासस्थानी हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः सक्रिय होत काही आमदारांना थेट फोन केले आहेत. त्यांनी आमदारांची विचारपूस करत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आणि आमदारांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ठाकरेंची पुढील रणनीती
गुरुवारी ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्व खासदारांची बैठक बोलावली असून, यासाठी सर्व खासदारांना कडक ‘व्हीप’ लागू करण्यात आला आहे. या बैठकीनंतरच नेमके कोण सोबत आहे आणि कोण नाही, याचे अधिकृत चित्र स्पष्ट होईल. वर्धापन दिनाच्या औचित्याने (Uddhav Thackeray) १९ जून रोजी होणाऱ्या ‘शिवगर्जना मेळाव्यात’ उद्धव ठाकरे या सर्व राजकीय भूकंपावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर जाहीर भाष्य करण्याची शक्यता आहे. खासदारांच्या फुटीनंतर आता आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी २२ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची विशेष बैठक बोलावली आहे.
बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेश लांबणीवर; दिल्लीतून सुरक्षित स्थळी रवाना
दुसरीकडे, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या या ६ खासदारांचा इतर पक्षात होणारा अधिकृत प्रवेश पुढील २ ते ३ दिवस लांबणीवर पडल्याची माहिती आहे. ठाकरे गट या फुटीविरोधात कोणती कायदेशीर पावले उचलू शकतो, याचा अंदाज घेतला जात आहे.
सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास केल्यानंतरच या खासदारांच्या नव्या पक्षप्रवेशाची घोषणा केली जाईल. दरम्यान, सुरक्षेचे कारण पुढे करत या सर्व ६ खासदारांना तातडीने दिल्लीतून अज्ञात सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.






