Political News : राजकारणात मोठी खळबळ ! ‘या’ नेत्याने आमदारकीचा राजीनामा देत पक्षाची सोडली साथ
देशाच्या राजकारणात (Political News) गेल्या काही काळापासून अत्यंत नाट्यमय आणि मोठे बदल पाहायला मिळत असून, अनेक राज्यांमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

Political News : देशाच्या राजकारणात (Political News) गेल्या काही काळापासून अत्यंत नाट्यमय आणि मोठे बदल पाहायला मिळत असून, अनेक राज्यांमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या राजकीय वादळाचा सर्वाधिक फटका सध्या तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK ला बसताना दिसत आहे.
पक्षांतर्गत धुसफूस आणि नाराजीमुळे AIADMK च्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच (Political News) चालल्या आहेत. यातच आता पक्षाला आणखी एक प्रचंड मोठा धक्का बसला असून, आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत माजी मंत्री एम.आर. विजयभास्कर यांनी पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
विजयभास्कर यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे ते AIADMK ची साथ सोडणारे सहावे मोठे आमदार ठरले असून, तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
करूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार एम.आर. विजयभास्कर हे लवकरच तमिळनाडूतील वेगाने उदयास येत असलेल्या सत्ताधारी TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षात जाहीर प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विजयभास्कर हे AIADMK पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते असून त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पक्ष सोडताना त्यांनी सोशल मीडियावरून एक सविस्तर पोस्ट लिहीत AIADMK च्या सध्याच्या नेतृत्वावर अत्यंत गंभीर आणि धारदार आरोप केले आहेत.
सध्याचे AIADMK नेतृत्व आणि सत्ताधारी DMK यांच्यात पडद्यामागे (Political News) कथित युती किंवा साटंलोटं असल्याचा खळबळजनक संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दिवंगत नेत्या जयललिता यांनी ज्या DMK पक्षाला आयुष्यभर ‘दुष्ट शक्ती’ मानले आणि ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, त्याच DMK सोबत आजचे AIADMK चे नेते हातमिळवणी कशी करू शकतात, असा थेट आणि तिखट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच त्यांनी AIADMK चे प्रमुख एडप्पडी के. पलानीस्वामी यांच्या एकतर्फी कारभारावर आणि कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला. विजयभास्कर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमचा विरोध वैयक्तिकरित्या पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाला कधीच नव्हता, तर त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आणि हुकूमशाही निर्णयांना होता.
पलानीस्वामी यांना पक्षाचा कायमस्वरूपी महासचिव बनवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून आम्हा नेत्यांपर्यंत सर्वांनीच जीवाचे रान केले होते. मात्र, पक्ष सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना आणि वरिष्ठ नेत्यांनी घेतलेले आक्षेप पूर्णपणे धुडकावून लावण्यात आले.
या एकतर्फी निर्णयांच्या मालिकेमुळेच आज संपूर्ण पक्ष अस्तित्वाच्या संकटात सापडला आहे. अखेर अत्यंत जड अंतःकरणाने मनात खोल दुःख आणि डोळ्यात अश्रू घेऊन आपण या मातृसंस्थेचा निरोप घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयभास्कर यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत करूर मतदारसंघातून DMK च्या व्ही. सेंथिल बालाजी यांच्याकडून त्यांचा अत्यंत निसटता पराभव झाला होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या एप्रिल २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत दमदार पुनरागमन केले होते.
या निवडणुकीत त्यांनी TVK चे उमेदवार व्ही. पी. मथियलगन यांचा १,८२१ मतांच्या फरकाने पराभव करून आपले राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी आमदारकी सोडल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या AIADMK पक्षाला लागलेली ही गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. पक्षांतर्गत असलेल्या तीव्र कलहामुळे एकामागून एक मोठे नेते बाहेर पडत आहेत. एम.आर. विजयभास्कर यांच्या आधीच माजी आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनीही आपल्या आमदारपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला आहे, तेही लवकरच TVK पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
या दिग्गज मंत्र्यांसोबतच मरगथम कुमारवेल, पी. सत्यभामा, एस. जयकुमार आणि इसाक्की सुबैया यांसारख्या प्रमुख आणि मातब्बर नेत्यांनी आधीच AIADMK ची साथ सोडून TVK चा झेंडा हाती घेतला आहे. लागोपाठ सहा प्रमुख आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे (Political News) पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील AIADMK च्या अस्तित्वाचा संघर्ष आता कमालीचा वाढला आहे.






