Political News : राजकारणात मोठी घडामोड ! विरोधी पक्षांचे ‘हे’ 5 बडे नेते एकाच वेळी ‘TVK’ मध्ये सामील
तामिळनाडूच्या राजकारणातून (Political News) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कझगम' या सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे.

Political News : तामिळनाडूच्या राजकारणातून (Political News) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कझगम’ या सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे.
तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK आणि DMK मधील ५ दिग्गज नेत्यांनी अधिकृतपणे ‘टीव्हीके’ पक्षात प्रवेश (Political News) केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे थलपती विजय यांच्या पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.
विरोधी पक्षांमधील बड्या नेत्यांची ‘टीव्हीके’मध्ये एन्ट्री
अभिनेते विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही काळातच थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ‘तमिलगा वेत्री कझगम’ (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आणि इतर घटक पक्षांच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. आता सत्ताधारी पक्षात आल्यानंतरही विजय यांच्या पक्षात नेत्यांची ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे.
नुकतेच विरोधी पक्षातील ५ ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी थलपती विजय यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. यात AIADMK च्या ४ माजी मंत्र्यांचा आणि सत्ताधारी DMK च्या एका माजी आमदाराचा समावेश आहे.
पक्षात प्रवेश केलेले ‘ते’ 5 मोठे चेहरे कोणते?
तामिळनाडूच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव असलेल्या AIADMK (अण्णा द्रमुक) पक्षाला या पक्षांतरामुळे मोठा फटका बसला आहे. AIADMK सरकारच्या काळात मंत्री राहिलेले ४ बलाढ्य नेते आता ‘टीव्हीके’चे झाले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
१. एमसी संपत (माजी मंत्री, AIADMK)
२. एनआर शिवापती (माजी मंत्री, AIADMK)
३. कडंबूर सी राजू (माजी मंत्री, AIADMK)
४. उदुमलाई के राधाकृष्णन (माजी मंत्री, AIADMK)
या चारही माजी मंत्र्यांसोबतच, DMK (द्रमुक) पक्षाचे माजी आमदार जे. करुणानिधी यांनीही थलपती विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘टीव्हीके’ पक्षात प्रवेश केला आहे.
कट्टर विरोधक आता एकाच छताखाली!
तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात DMK आणि AIADMK हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पारंपारिक आणि कट्टर विरोधक (Political News) मानले जातात. परंतु, थलपती विजय यांच्या वाढत्या प्रभावामुळे या दोन्ही विरोधी छावण्यांमधील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत सत्ताधारी ‘टीव्हीके’ पक्षाचा हात धरला आहे. प्रवेश केलेल्या सर्वच नेत्यांना राजकारणाचा आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने याचा थेट फायदा विजय यांच्या पक्षाला होणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर तामिळनाडूत ‘टीव्हीके’ पक्ष कमालीचा मजबूत झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील एवढ्या मोठ्या नेत्यांचे पक्षात येणे, हे थलपती विजय यांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाचे संकेत मानले जात आहेत.






