पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत बोलताना राज ठाकरे यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले. महाराष्ट्रातील नागरिकांनी शक्य तितक्या ठिकाणी मराठीतच संवाद साधावा, असे आवाहन करत, “तुम्ही मराठीत बोला, समोरचा हिंदीत बोलू दे; पण शेवटी तोही मराठीत बोलायला भाग पडेल.” असे ते म्हणाले.
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर मराठीत भाषण करतात, याचा अभिमान वाटतो असे म्हणत समाजात कवी-लेखकांकडेही जातीय नजरेतून पाहिले जाते, ही खेदजनक बाब असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
सी. डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची आठवण करून देत त्यांनी त्यांचे कौतुक केले. इतिहासातील महापुरुषांचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. जातीपातींमध्ये महापुरुषांना विभागणे ही चुकीची प्रवृत्ती असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राची मोठी प्रगती झाली, कोयना धरणासारखे प्रकल्प उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना एकत्र आणण्याचे काम केले, तर शरद पवार यांच्या योगदानालाही विसरता येणार नाही, असेही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
“जिथे जाल तिथे मराठीतच बोला; आपल्या भाषेचा अभिमान ठेवा.” असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केले.
राज ठाकरेंनी उपस्थित केले सवाल
रिक्षावाले काही झालं तरी मराठी बोलणारा नाही असे म्हणतात ही हिंमत येते कुठून? हेच तामिळनाडू पश्चिम बंगलला जाऊन हिमंत करु शकता का? असे सवालही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले.
….तर आजपासून कारवाई होणार
मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर 1 मेपासून कारवाई होणारच, त्याबद्दल कुणीही संभ्रमात राहू नये, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. आजपासून म्हणजेच 1 मेपासून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले आहे. पिंपरी चिंचवड येथील बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
हेही वाचा : Shirur Crime : रक्ताची नाती शेतीसाठी भिडली! चांडोह येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी, ९ जणांवर गुन्हा