ईव्हीएम छेडछाडीवरून राजकीय वादंग
Updated On:

नवी दिल्ली/मुंबई – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या निकालावरून देशासह राज्यातील राजकीय वातावरण रविवारी ढवळून निघाले.
तसेच या मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मोबाईल वापरत असल्याच्या कथित वृत्ताचा हवाला देत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाडीचा दावा केला.
तसेच टेस्लाचे संचालक एलॉन मस्क यांनी देखील ईव्हीएमच्या वापराबाबत साशंकता व्यक्त केली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत हे सर्व दावे फेटाळून लावले आहे.





