Sharad Pawar : राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ.! शरद पवारांचा पुन्हा बसणार मोठा धक्का; ५ खासदार सोडणार साथ
किमान ५ खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा आहे.

Sharad Pawar – महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या संभाव्य फुटीची चर्चा रंगलेली असतानाच, आता शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ पक्षालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘तुतारी’चे किमान ५ खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राज्याचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar )
माध्यमांशी बोलताना आत्राम म्हणाले की, आम्ही स्वतः कोणतेही ऑपरेशन घड्याळ राबवणार नाही, तर तुतारीचे खासदार स्वतःच पक्षातून बाहेर पडतील. खासदारांना आपल्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधीची गरज असते आणि त्यासाठी ते विकासासोबत राहणे पसंत करतील. (Sharad Pawar)
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढला असून, १२ डिसेंबर २०२६ पर्यंत हे ५ खासदार अजित पवार गटात सामील होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसचेही काही खासदार निधी आणि विकासकामांसाठी आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. (Sharad Pawar )
दरम्यान, आत्रामांच्या या दाव्यावर शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पलटवार केला असून, आमचा एकही खासदार फुटणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Sharad Pawar)






