Police Transfer – कोल्हापूर परिक्षेत्रातील १५ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या परिक्षेत्रस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत या बदल्यांना मान्यता देण्यात आली.विनंती, प्रशासकीय कारणास्तव आणि जनहिताच्या दृष्टीने विहित कालावधी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये परस्पर बदल्या आदेशित करण्यात आल्या आहेत.बदली झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये नेताजी शहाजी गंधारे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), राहुल पुंडलिक लाड (पुणे ग्रामीण ते सातारा), अमित पंढरीनाथ बाबर (सातारा ते सोलापूर ग्रामीण), सिकंदर विष्णू वर्धन (सांगली ते सोलापूर ग्रामीण), चेतन मनोज मछले (सातारा ते पुणे ग्रामीण), महारूद्र बबन परजणे (सोलापूर ग्रामीण ते सातारा), ज्ञानेश्वर दत्तात्रय उदार (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), मिटू नामदेव जगदाळे व नेताजी सुखदेव बंडगर (सोलापूर ग्रामीण ते सातारा) यांचा समावेश आहे.तसेच अक्षय आप्पासो सोनावणे (सातारा ते कोल्हापूर), हेमंतकुमार शामराव काटकर (सोलापूर ग्रामीण ते सातारा), लहू गौतम थाटे (पुणे ग्रामीण ते सांगली), महेश अनिरुद्ध माने व संदेश ज्ञानेश्वर बावकर (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), तसेच नागनाथ जयराम खुणे (सोलापूर ग्रामीण ते सातारा) यांच्या बदल्याही आदेशित करण्यात आल्या आहेत.संबंधित घटक प्रमुखांना हे बदली आदेश तात्काळ बजावण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना पर्यायी अधिकारी येण्याची वाट न पाहता कार्यमुक्त करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.