Pimpri | पोलिसांनी नाकाबंदी, गस्त वाढवावी

पिंपरी, – चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी या परिसरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. याबाबत सांगवी पोलिसांना निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी या परिसरातील दागिने, मोबइल हिसकाविणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली असून ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभ्रू मोठ्या सोसायट्या आहेत. त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.
तसेच इथे छोटे मोठे हॉटेल व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालकव नागरिक घरी परतत असताना त्यांना या चोरट्यांकडून धारदार हत्यार किंवा बंदुकीच्या धाकाने लुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनांचे गांभिर्य लक्षात घेऊन, त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनात केली आहे.





