विजय वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
\nया प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, तरुणांच्या आयुष्याशी राज्य सरकार खेळ करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हंटले की, “राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला.
\nतज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे.”
\nपुढे ते म्हणाले, “पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच.
\n३९७७ मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
\n\n\nराज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे.
\nमहाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी… pic.twitter.com/lwPlgoz4fX
\n— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 5, 2026
\nनेमका काय आहे आरोप ?
शनिवारी (२ मे) रोजी एसआरपीएस – या गटाची शंभर गुणांची लेखी परीक्षा पार पडली. ही परीक्षा इंदापुरातील एका महाविद्यालयात झाली. प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता, असे एकूण १०० प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. त्याच शंभर प्रश्नांची क्रमवारी मागे-पुढे करून ए, बी, सी आणि डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले होते. या परीक्षेतील चारही प्रश्नपत्रिकेत ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून उचलण्यात आले होते.
\nया परीक्षेतील प्रश्नसंच ए मध्ये अगदी त्या सराव संचातील क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायांनुसार जसेच्या तसे प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच काही उमेदवारांनी प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा संशयही व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी केली आहे.
\nहेही वाचा:
\nKiara Advani : अखेर त्या चर्चांवर कियाराने मौन सोडलं; दोनच शब्दांची पोस्ट शेअर करत म्हणाली…
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Police Bharati : पोलीस भरतीत घोटाळा? १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे…; वडेट्टीवार आक्रमक","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Police-Bharati.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Police-Bharati.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive#webpage","name":"Police Bharati : पोलीस भरतीत घोटाळा? १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे…; वडेट्टीवार आक्रमक","url":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive","inLanguage":"mr","description":"Police Bharati : सुप्रिया सुळेंची सखोल चौकशीची मागणी ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Police-Bharati.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/police-recruitment-scam-85-out-of-100-questions-are-from-a-private-publishers-book-vadettiwar-is-aggressive","name":"Police Bharati : पोलीस भरतीत घोटाळा? १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे…; वडेट्टीवार आक्रमक"}}]}}}