Kiara Advani : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या आगामी ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता यशसोबत ती स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात यशसोबत कियाराने इन्टिमेट सीन शूट करून त्यानंतर ते हटवण्याची मागणी केली असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता कियारा चांगलीच भडकली असून तिने सोशल मीडियावर दोन शब्दांत पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम देत संताप व्यक्त केला आहे. कियाराने सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत बोल्ड सीन हटवण्याबाबतच्या चर्चांना “Absolute Nonsense” असे म्हणत स्पष्टपणे नाकारले आहे. खरंतर टॉक्सिक चित्रपटाच्या टीझरमधील एका बोल्ड सीनवरून यापूर्वीही मोठा वाद निर्माण झाला होता. एका कारमधील इन्टिमेट सीनवरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, कियाराने यशसोबत एक बोल्ड रोमँटिक सीन शूट केला होता, असे सांगण्यात आले होते. दिग्दर्शकांनी तो सीन तिच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून शूट केला जाईल, असं आश्वासन तिला दिलं होतं. मात्र अंतिम आउटपुट पाहिल्यानंतर कियारा या सीनबाबत पुन्हा विचार करत असल्याचं समोर आल्याच्या अफवा होत्या. (Kiara Advani) Kiara Advani : अखेर त्या चर्चांवर कियाराने मौन सोडलं; दोनच शब्दांची पोस्ट शेअर करत म्हणाली… हा चित्रपट यंदाच्या बहुचर्चित प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात असून, वैयक्तिक आयुष्यात आई झाल्यानंतरचा कियाराचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये वारंवार बदल होत असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले असून यश हा या चित्रपटात मुख्य अभिनेत्यासह निर्माता देखील आहे. ‘टॉक्सिक’ची नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे टॅाक्सिक नक्की कधी रिलीज होणार या प्रतिक्षेत चाहते आहेत. याशिवाय यश त्याच्या आगामी रामायणा चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. हेही वाचा : Ekta Kapoor : ‘नागिन 7’च्या एपिसोडमध्ये मोठी चूक, ट्रोल होताच एकता कपूर म्हणाली…