ब्रेकिंग…! पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस
Updated On:

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे.
खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवीले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्या पार्शवभूमीवर दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला असून या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.





