पोलिसांना मिरवणुकीत गणवेशात नाचण्यास मनाई; मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी

Ganesh Festival 2024 | गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. घरगुती बापांसह अनेक मंडळांमध्येही गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मात्र अनेकदा मिरवणूकांदरम्यान खाकी वर्दीत पोलिस नाचताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतात. परंतु आता गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पोलीसांना गणेशोत्सवादरम्यान नाचता येणार नाही.
पोलीस आयुक्तांचे आदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान वर्दीवर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
Maharashtra | On September 6, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar during the meeting over security and police arrangements for the Ganpati festival, warned all officers that if any policeman is found dancing in uniform, strict action will be taken against them. He said…
— ANI (@ANI) September 6, 2024
त्यानुसार, गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात अथवा गाण्यांवर कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये काही पोलिसांचे गणवेशात नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांनी हे आदेश जारी करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस सज्ज
गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबई पोलिसांनी गणपती आगमनासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. सर्व मार्गांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा:
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात…





