पुणे – शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर बलात्काराचा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. यावरून भाजपनेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल कला.
पीडित मुलीनं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असुन अत्याचाराचा आरोप केलाय. तसेच व्हाट्सअप चॅट देखील फेसबुकवर टाकलं आहे. कुचिक हा शिवसेनेचा उपनेता आणि भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. तसेच, राज्याच्या किमान वेतन समितीचा अध्यक्ष आहे.
चित्रा वाघ यांनी मुलीच्या तक्रारीनंतरचा घटनाक्रम सांगितला. त्या म्हणाल्या की, आपण पुणे पोलिसांना वेळीच कॉल केला होता. मात्र आपला कॉल रिसीव्ह झाला नाही. त्यानंतर गृहमंत्र्यांशी चर्चा केली.
दरम्यान पोलिस एकाला म्हणतात पीडित मुलगी वडिलांसोबत सुखरूप आहे. मी सिनीयर पीआयला विचारलं तर ते म्हणतात, पीडित मुलगी गायब आहे. ती कुठंय ते ठावूक नाही. पोलीस सत्ताधाऱ्यांना काय मॅसेज देतायत आणि विरोधकांना काय सांगतात, याची शहानिशा करण्यासाठी मी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला. मात्र पुन्हा त्यांनी फोन घेतला नाही.
मी समजू शकते, सत्ताधाऱ्यांची फार मोठी बलात्कारी पिलावळ पुणे शहरात फिरतेय या पिलावळीला वाचविण्यात पोलीस व्यस्त असल्याची, टीका चित्रा वाघ यांनी आयुक्तांवर केली.