Nagpur SBL Company Blast : नागपूर स्फोटाप्रकरणी पोलिसांकडून 11 जणांना अटक; धक्कादायक बाब तपास अहवालातून समोर
Nagpur SBL Company Blast : या प्रकरणात एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० आरोपी फरार आहेत. यात कंपनीचा मालक आलोक चौधरी हा देखील अद्याप फरार आहे.

Nagpur SBL Company Blast : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी या कंपनीचे दोन मुख्य संचालकासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूरच्या SBL कंपनीतील स्फोटाप्रकरणी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत कंपनीचे संचालक रवी प्रकाश चंद्र कामरा आणि राकेश सुदर्शन तिवारी यांनाही ताब्यात घेतले आहे. या कंपनीच्या सुरक्षेतील त्रुटी आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतींची जबाबदारी असलेले अधिकारी आणि प्रोडक्शन मॅनेजर्स यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बिल्डिंग १६-A आणि १६-B च्या जबाबदार अधिकाऱ्यांसह लोडिंग आणि प्रोडक्शन सुपरवायझर्सनाही आरोपी करण्यात आले आहे.
कंपनीचा मालक अद्यापही फरार
दरम्यान, या प्रकरणात एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० आरोपी फरार आहेत. यात कंपनीचा मालक आलोक चौधरी हा देखील अद्याप फरार आहे. पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. ६ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या स्फोटाचे नेमके तांत्रिक कारण आणि सुरक्षेतील त्रुटींची कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
तपास अहवालातून समोर धक्कादायक माहिती समोर
तर दुसरीकडे, एसबीएल कंपनीकडून सुरक्षा नियमाचे थेट उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपास अहवालातून समोर आली आहे. कंपनीने नोनल क्रिंपिंग युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांना तातडीने दुसऱ्या इमारतीत न हलवता तेथेच साठा केला होता. त्यामुळे अपघात होताच संपूर्ण इमारत उडाली.
पेसो आणि डिशच्या पथकाने 21 जून 2024 रोजी एसबीएल कंपनीला भेट देत सुरक्षा तपासणी केली होती. त्यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. पथकाने एसबीएल कंपनीला आवश्यक सुधारणा करण्यास सूचना केल्या, मात्र कंपनीने दुर्लक्ष केले. Nagpur SBL Company Blast
दरम्यान, नागपूरच्या SBL कंपनीत १ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. नागपूरच्या काटोल तालुक्यातील रावळगाव येथील SBL कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 19 कामगारांचा मृत्यू झाला असून 23 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. Nagpur SBL Company Blast
हेही वाचा:






