Poland Football : पोलंडचा गोलकिपर वोज्शिच स्झेस्नी निवृत्त…

वॉर्सा – पोलंडचा गोलकिपर असलेल्या वोज्शिच स्झेस्नीने जुव्हेंटस क्लब सोडल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यामध्ये निवृत्ती स्वीकारली. आर्सेनलपासून व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्झेस्नीने ८४ लढतींमध्ये पोलंडचे प्रतिनिधित्व केले.
स्झेस्नीने २००६ मध्ये लेगिया वॉर्सा येथून आर्सेनल क्लबमध्ये किशोरवयातच सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने गनर्ससह ब्रेंटफोर्ड या दोन्ही क्लबचे प्रतिनिधित्व केले. स्झेस्नीने तब्बल १८१ लढतीमध्ये आपले योगदान दिले आहे. त्याने एफ ए करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीचा देखील समावेश होता. त्याने २०१३-१४ या साली स्झेस्नी व पेट्र सेच या दोघांना गोल्डन गोव्ह संयुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सन २०१७ मध्ये त्याने जुव्हेंटसशी करार केला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला जुव्हेंटस आणि स्झेस्नी यांनी दोघातील करार संपुष्टात आणण्यासाठी सहमती दर्शविली होती. स्झेस्नीने २०१७ ते २०२४ दरम्यान जुव्हेंटस क्लबचे २५२ लढतीत प्रतिनिधित्व केले. यात त्याने तीन इटालियन लीग विजेतेपद, तीन इटालियन कप आणि दोन इटालियन सुपर कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
US Open 2024 : अल्काराझ, सिनर, नाओमी, इगा स्विटेक दुसऱ्या फेरीत दाखल…
मी कधीही कमीपणाची भावना न बाळगता इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंसह खेळलो आहे. यामुळे माझ्याकडे फुटबॉलच्या अत्यंत सुंदर आठवणी जमा झाल्या असून आता केवळ कुटूंबाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया स्झेस्नीने दिली.





