PoK Protest : पीओकेमधील पाक सैन्याच्या कारवाईची दखल घ्यावी; भारताचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील शांततापूर्ण आंदोलकांविरुद्ध पाकिस्तानने (PoK Protest) त्कूरतेने केलेल्या बळाच्या वापराची चौकशी करावी आणि या अत्याचारांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरावे, असे आवाहन भारताने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.

PoK Protest : पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील शांततापूर्ण आंदोलकांविरुद्ध पाकिस्तानने (PoK Protest) त्कूरतेने केलेल्या बळाच्या वापराची चौकशी करावी आणि या अत्याचारांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरावे, असे आवाहन भारताने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.
या प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना, २७ जुलैपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत (PoK Protest) सुमारे ४० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधील शांतताप्रिय नागरिकांवर क्रूरपणे बळाचा वापर करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
वाढती महागाई, प्रशासकीय अनास्था आणि अल्पसंख्याकांवरील राजकीय भेदभाव व अत्याचारांच्या निषेधार्थ पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या महिन्यापासून मोठे आंदोलन सुरू आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना शत्रू ठरवले, तेव्हाच पाकव्याप्त काश्मीरमधील निष्पाप लोकांबद्दलचा त्यांचा संपूर्ण अनादर उघड झाला, असे जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या मुजाहिदीनांना पाकिस्तानी व्यवस्थेने प्रशिक्षण दिले, शस्त्रे पुरवली आणि भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी पाठवले होते, त्यांनी आता आपली शस्त्रे पाकिस्तानकडेच वळवली आहेत आणि स्वतःलाच शासनाविरुद्ध शस्त्र म्हणून वापरले आहे. असे पाकिस्तानी पंतप्रधानांचे राजकीय घडामोडींवरील विशेष सहाय्यक राणा सनाउल्लाह यांनी उघडपणे कबूल केले असल्याचेही जयस्वाल म्हणाले.
तथाकथित निवडणुका (PoK Protest) म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेला अपमानित करून नाकारले गेल्याचे ठळक उदाहरण आहे. हिंसक राजवटीचा सामना करत असलेल्या जनतेने, बेकायदेशीर हत्यांची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांकडे विनंती केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाक सैन्याने केलेल्या कारवाईची छाननी करावी आणि या अत्याचारांबद्दल जबाबदार धरावे, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.






