PMRDA: पीएमआरडीएकडून पालखी सोहळ्याचे स्वागत
PMRDA:

दिंडीप्रमुखांचा सत्कार
PMRDA: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)तर्फे सासवड रस्त्यावरील वडकी नाला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे स्वागत करण्यात आले. यावेळी दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि फराळाची व्यवस्था करून सेवाकार्य राबविण्यात आले.
महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रमुख पालखी मार्गांवर विशेष स्वागत कक्ष उभारले होते.
वडकी नाला येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर पीएमआरडीएतर्फे दिंडीप्रमुखांचा सत्कार केला. कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके व उपअभियंता नंदकुमार खोत यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम झाला.
कनिष्ठ अभियंता संकेत सानप, ललित शिंदे, कार्तिक पाटील, पुरुषोत्तम शामल, किरण कोष्टी आणि अनिल जाधव यांनी वारकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन पथक (पीडीआरएफ) तैनात केले होते.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, सहाय्यक लेखाधिकारी पूनम बोराटे आणि उपअभियंता अमित तिडके यांच्या उपस्थितीत दिंडीप्रमुखांचा सन्मान झाला. वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.




