“पीएमपी’च्या धावत्या “सीएनजी’ बसला आग

Updated On:

पिंपळे निलख – पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड मार्गावरील बसने बुधवारी (दि. 27) सकाळी अचानक पेट घेतला. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड जाणाऱ्या सीएनजी बस (एम. एच. 12 एच. बी. 1438) या दापोडी ते पिंपळे गुरव जोडणाऱ्या होडीचा पूल या पवना नदीवरील पुलावर अचानक पेट घेतला.

बसला अचानक लागलेल्या या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.चालकाची केबिन तसेच प्रवाशांच्या चाळीस टक्‍के आसन व पुढील बसचा संपूर्ण भाग आगीने कवेत घेतला. काही वेळातच बसचा पुढील भाग जळून खाक झाला. यावेळी बसचे चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरविण्यात यश मिळविले. यावेळी रस्त्याने जात असलेले सांगवी येथील रोहन दाभाडे प्रत्यक्षदर्शी यांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलास फोनद्वारे देत घटनेच्या गंभीर स्वरूप कळवले.

काही मिनिटातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच महिला कर्मचाऱ्यांनी बसच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंतमधील काळात आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन बसच्या पुढील भाग जळून खाक झाला. या बसमध्ये सकाळची वेळ असल्याने अनेक चाकरमानी ज्येष्ठ, नागरिक तसेच शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी बसने प्रवास करत असल्याचे रोहन दाभाडे यांनी सांगितले. परंतु नागरिकांची सतर्कता व चालक व वाहकाच्या तत्परतेमुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यानंतर घटनास्थळी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली.

मी कामानिमित्त बसने प्रवास करीत होतो. या बसला आग लागली कळाले, सोबतच्या काही सहकऱ्यांना घेऊन वाहक व चालकांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित खाली उतरविले. त्यानंतर मदत करण्यासाठी पुढे आलो. कारण काही नागरिक मदत करण्याऐवजी व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी गर्दी करीत होते. अशा वेळी मदत प्रथम करणे आवश्‍यक असल्याचे नागरिकांनी लक्षात घेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
– ऋषभ काटे, दापोडी

बस जळत असल्याने नागरिक भयभीत झाले होते; पण अन्य नागरिक व बस कर्मचारी यांनी वेळेचे भान ठेवून प्रवाशांना सुरक्षित उतरवले. यावेळी अग्निशमन दलास फोन करून तात्काळ मदत केली.
– रोहन दाभाडे, प्रत्यक्षदर्शी, सांगवी.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन