PMPML News – महाशिवरात्रीवेळी भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेत पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगर परिवहन मंडळातर्फे निळकंठेश्वर, बनेश्वर आणि घोरावडेश्वर मंदिरांकडे जाण्यासाठी रविवारी तीन अतिरिक्त मार्गांवर बसेस चालवल्या जाणार आहेत, तसेच नियमित मार्गांच्या गाड्यांची वारंवारितादेखील वाढवली आहे.त्यानुसार कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा), स्वारगेट ते निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर) आणि निगडी (पवळे चौक) ते घोरावडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या अतिरिक्त मार्गांवर पहाटेपासून गाड्या चालवल्या जातील. बनेश्वरला जाण्यासाठी कात्रज ते सारोळा मार्गे कापूरहोळ (बसमार्ग क्रमांक ६), कात्रज सर्पोद्यान ते सासवडमार्गे बालाजी मंदिर केतकावळे (क्र २९३), कात्रज सर्पोद्यान ते वेल्हे (क्र. २९६) आणि कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी (क्र. २९६अ) या चार मार्गांवर सरासरी २० मिनिटांच्या वारंवारितेने गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. निळकंठेश्वरला जाण्यासाठी नियमितपणे चालणाऱ्या स्वारगेट ते पानशेत/वरसगाव (क्र ५२ अ) गाड्यांची सरासरी वारंवारीता १० ते १५ मिनिटे असणार आहे. स्वारगेट ते निळकंठेश्वरला जाणाऱ्या जादा गाडीची पहिली फेरी सकाळी ३.३० वाजता होईल.घोरावडेश्वरला जाणाऱ्या कात्रज ते वडगाव मावळ (क्र. २२८), पवळे चौक ते वडगाव मावळ (क्र.३०५ ), निगडी ते बेबड ओव्हळ (क्र. ३३२), निगडी ते उर्सेगावमार्गे तळेगाव (क्र. ३४१), निगडी ते उर्सेगावमार्गे परंदवाडी (क्र. ३४२), निगडी ते लोणावळामार्गे कामशेत (क्र.३६८) आणि ३७१-निगडी ते टाकवे फळणे फाटा (क्र. ३७१) अशा ७ मार्गांवर गाड्यांची संख्या वाढविण्यात आली असून, सरासरी १० ते १५ मिनिटांच्या वारंवारितेने गाड्या उपलब्ध असणार आहेत.