Accident News: कात्रजमध्ये पीएमपीएमएल बसची पादचाऱ्यांना धडक; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
Accident News : अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज चौकात भाजी मंडईसमोर आज (रविवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपीएमएलच्या भरधाव बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
निहाल विलास पवार ( २४, रा. संतोषनगर, कात्रज) आणि रोहन सुखदेव घोळवे उर्फ साहिल (१८, रा. संतोषनगर, कात्रज) हे दोघे पहाटे कात्रज चौकात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पीएमपीएमएलची बस (क्रमांक एमएच १२ एसएफ ७५७४) भरधाव वेगाने आली. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने दोघांना जोरदार धडक दिली.
अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना निहाल पवार याचा मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातानंतर बसचालक पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे काम सुरू आहे. तसेच पीएमपीएमएल कार्यालयातून बसचालकाची माहिती घेतली जात आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
Madhuri Dixit : डोक्यावर ग्लास अन्… ‘जमाल कुडू’वर माधुरी दीक्षितने धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल





