Madhuri Dixit : डोक्यावर ग्लास अन्… ‘जमाल कुडू’वर माधुरी दीक्षितने धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल
Madhuri Dixit : व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव

Madhuri Dixit : ‘ॲनिमल’ चित्रपटातील अभिनेता बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ या गाण्याला मोठी पसंती मिळाली. यातील डान्स स्टेपही प्रचंड व्हायरल झाली होती. याच गाण्यातील स्टेप आता माधुरी दीक्षितने रीक्रिएट केली आहे. सध्या तिचा या डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या गाण्यात बॉबी देओलने डोक्यावर ग्लास ठेवून डान्स केला होता. आता हीच हुक स्टेप माधुरी दीक्षितने केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
सध्या तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंटचावर्षाव होत आहे. काहींनी याला ‘जमाल कुडूचा फेमिनिस्ट व्हर्जन’ म्हटलं आहे. तर काहींनी ‘ती कमाल आहे’ असे म्हणत माधुरीचे कौतुक केले आहे.
Uff this lady is unbeatable. So graceful. Madhuri gives out Sandhya vibes – the six pot on head balancing dance/song – are ja re hatt natkhat https://t.co/TTvm8lOPFV
— Smita Prakash (@smitaprakash) November 7, 2026
माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकतीच एका दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये तृप्ती डिमरीसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. याशिवाय डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही दिवाळी पार्टी आयोजित केली होती, जिथे माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. नेने आणि मुलगा अरीन नेने यांच्यासोबत पोहोचली होती.
दरम्यान, माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या मराठी शोचे सूत्रसंचालन करत आहे. माधुरी शेवटची ४ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘माँ बहन’ या चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा:





