पुणे – संपूर्ण वर्षाचा मिळकतकर (Property Tax) एकदम भरून सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत घेण्यासाठी आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. १५ जून रोजी रात्री बारावाजेपर्यंत चालू वर्षाच्या संपूर्ण मिळकतकराचा भरणा करणाऱ्या नागरिकांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दि. १ एप्रिल २४ ते १४ जूनपर्यंत सहा लाख ७५ हजार १९३ मिळकतधारकांनी १२७९ कोटी ७७ लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. यात ३८२ कोटी ८८ लाख धनादेशाद्वारे, १२५ कोटी १९ लाख रुपये रोखीने तर सर्वाधिक ७७१ कोटी ६९ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आहेत. Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक… दरम्यान, मिळकतकर भरण्यासाठी पालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत खुली राहतील. तसेच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीनेही करभरणा करता येईल. नागरिकांना काही समस्या असल्यास १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.