PMC News : पीएमपीमध्ये बढतीचा ‘झोल’? महापालिकेच्या मुख्यसभेत काँग्रेसचं आंदोलन; काय आहे नेमके प्रकरण?
PMC News : पीएमपीला कोट्यवधींची मदत देऊनही प्रवाशांना सुविधा का नाही? काँग्रेस गटनेते चंदू जगताप आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा सवाल.
Updated On:

PMC News – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( पीएमपीएमएल) मधील बढती गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल जाहीर करावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी काॅग्रेसने पालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी आंदोलन केले. यावेळी पीएमपीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या विरोधात घोषणा देत कारवाईची मागणी केली.
काॅग्रेसचे गटनेते चंदू जगताप यांच्यासह, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी महापौरांसमोर कारवाईच्या मागणीचे फलकही झळकाविले. त्यावेळी विरोधीपक्ष नेते निलेश निकम यांनी पुढील आठ दिवसात खास सभा घेण्य़ाची मागणी केली.
तसेच पीएमपीला महापालिका मोठ्या प्रमाणावर संचलनतूट देत असतानाही पुणेकरांना योग्य सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली. महापालिकेने अद्याप पीएमपीसाठी संचालक नेमलेला नसल्याने संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. त्यामुळे विशेष सभा आठवड्यात घेता येणार नाही. समिती सदस्य नेमल्यानंतर ही सभा घेतली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी महापौरांनी आंदोलकांना दिले.





