PMC News : सात जागांसाठी ५१ जणांची यादी ? स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये सर्वाधिक चुरस
PMC News : महापालिका निवडणुकीत तब्बल ११९ जागा निवडून आल्याने भाजपचा एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्य संख्या ७ असणार आहे.

PMC News : महापालिका निवडणुकीत तब्बल ११९ जागा निवडून आल्याने भाजपचा एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्य संख्या ७ असणार आहे. या जागांसाठी भाजपमध्ये चुरस असून त्यासाठी तब्बल ५१ जणांची यादी पक्षाने तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका जागेसाठी पक्षाकडे जवळपास ७ ते ८ जण इच्छूक असल्याचे चित्र आहे.
महापालिकेत यंदा १६५ सदस्य असणार आहे. ही संख्या पाहता महापालिका अधिनियमानुसार १६.५ नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत नगरसेवक असणार आहे. महापालिकेचे पक्षीय बलाबल पाहता भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे दहामधील सात स्वीकृत नगरसेवक भाजपचे असणार आहेत. राष्ट्रवादी काॅग्रेसचे २ आणि काॅग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवक असणार आहे.
सर्वाधिक संख्या भाजपकडे असल्याने त्यांच्याकडे पालिकेत संधी मिळण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पक्षाने तिकिट कापलेले, पक्षाकडून थांबण्यास सांगण्यात आलेले तसेच कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या निष्ठावंताचाही समावेश आहे. त्यामुळे, स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकांनी पक्षाला साकडे घातले असून आपला विचार करावा यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.






