PMC Election: विकासाचा नवा ‘बेंचमार्क’ निर्माण करू; डाॅ. निवेदिता एकबोटे यांचा प्रचाराचा शुभांरभ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सामाजिक कार्य व जनसेवेत सक्रिय असलेल्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावित्रीबाई फुले जयंतीदिनी उत्साहात झाला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून सर्वसाधारण ‘ड’ जागेसाठी भाजप- आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांच्या उमेदवार असलेल्या डॉ. एकबोटेंच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने भगिनी सहभागी झाल्या.
प्रचाराचा प्रारंभ छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिरात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाला. या वेळी स्थानिक महिलांनी डॉ. एकबोटेंवर पुष्पवृष्टी करत आणि औक्षण करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या पदयात्रेत जोशी आळी, गणपती चौक, शिरोळे गल्ली आणि संपूर्ण गावठाण परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी माझा प्रभाग हा शहरातील ‘स्मार्ट प्रभाग’ म्हणून विकसित करण्याचा माझा मानस आहे. विकासाचा एक नवा ‘बेंचमार्क’ आपण निर्माण करणार असल्याची ग्वाही डाॅ. एकबोटे यांनी दिली.त्यात्पूर्वी समता भूमी येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राजेश पांडे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज, प्रभागातील नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





