PMC Election : जनता आमदार टिळेकर यांच्या पाठीशी : जगताप

कोंढवा – कोंढवा-येवलेवाडीच्या विकासासाठी गेली तीन दशके सातत्याने आमदार योगेश टिळेकर आणि टिळेकर परिवाराने विकासासाठी केलेल्या संघर्षामुळे यापुढील काळात कोंढवा-येवलेवाडी प्रभागातील जनता भारतीय जनता पार्टी व आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे माजी नगरसेवक विरसेन जगताप यांनी सांगितले
भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्र. ४० च्या उमेदवार रंजना टिळेकर, वृषाली कामठे, अर्चना जगताप, पूजा कदम यांच्या प्रचारासाठी कात्रज तलाव, उत्कर्ष सोसायटी, महादेव नगर, शेलार मळा या भागातील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कोंढवा- येवलेवाडीच्या विकासासाठी गेली तीन दशके आमदार योगेश टिळेकर आणि भारतीय जनता पार्टीने संघर्ष केला असून, रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य अश्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम टिळेकर यांनी केले सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, 250 बेड नॅचरोपॅथी हॉस्पिटल, आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्याची काळजी घेणारे अनेक आरोग्यदायी कामे केली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी टिळेकर यांनी या नेहमीच अग्रेसर भूमिका घेऊन सर्वाना सोबत घेत या भागाचा विकास साधला आहे. व्यायाम शाळा, अभ्यासिका.
शाळांची निर्मिती यासह अंतर्गत रस्त्यांचे काम यातून भाजपच्या पदयात्रा, प्रचार सभा, बैठकांना प्रतिसाद मिळत आहे, जनता भाजपला काैल देणार, असा दावा केला जात आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





