महर्षीनगर – प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील इशा पॅलेस,एकता गार्डन ,संदेश सोसायटी,संभवनाथ जैन मंदिर,दर्शनी चौक,चिरंजीवी हनुमान हनुमान मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ,भिमाले कॉम्लेक्स, हिमगिरी सोसायटी,युनिटी बेकरी सॅलिसबरी पार्क परिसर येथे भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर,मनिषा प्रविण चोरबेले यांच्या प्रचारार्थ या भागात भव्य पदयात्रा देखील संपन्न झाली. प्रामुख्याने सर्वसामान्य व्यापारी वर्ग व मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती असलेल्या या परिसरामध्ये सर्वसमावेशक मतदार राहतात. उमेदवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध व्यापारी धोरणांमुळे उद्योग व्यापार वाढीस लागला आहे.सर्वच क्षेत्रात या बारा वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे व्यापारी वर्ग हा मोदी सरकारवर विशेष खुश आहे. नवीन टॅक्स प्रणाली व टॅक्स कायद्यांमध्ये केलेले सकारात्मक बदल यांसह व्यापारास चालना देणारे अनेक निर्णय मोदी सरकारच्या काळात झाल्यामुळे व्यापारी वर्गाची भारतीय जनता पक्षाला विशेष पसंती आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्र व राज्यात सरकार आहे.त्याच पक्षाचे सर्व नगरसेवक स्थानिक स्तरावरील देखील अतिशय उल्लेखनीय असे काम करत असल्याने या भागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला एकमुखी असा पाठिंबा लाभत आहे. “कमळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने चारही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे. यावेळी नगरसेविका वंदना भिमाले,कविता वैरागे,प्रवीण चोरबोले, राजश्री शिळीमकर, पुणेशहर युवमोर्चा मा.सरचिटणीस अभिषेक भिमाले,गणेश शेरला, निखिल शिळीमकर,सुशील लोंढे,प्रशांत डोकोळे,प्रशांत जाधव,प्रमोद मोहिते,प्रशांत लोंढे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.