PMC Election : विकासाची जाण असलेल्या शिवसेना उमेदवारांना पालिकेत पाठवा; माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप आण्णा घुले यांचे आवाहन

मांजरी: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन प्रभागात चांगल्या पद्धतीने विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना पालिकेत पाठवावे,” असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपआण्णा घुले यांनी केले.
प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेना उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुतराव लोणकर, सीमा सुधीर घुले व निलेश दिलीप घुले यांच्या प्रचारार्थ मांजरी बुद्रुक, केशवनगर, साडेसतरानळी व शेवाळवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उमेदवारांसह दिलीप घुले यांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देत विकासाची माहिती दिली.
या पदयात्रेत विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, सागर घुले, अमोल मोरे, कुणाल मोरे, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ आण्णा, तेजस गायकवाड, आनंद मोरे, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड.
गौरीशंकर घुले, देविदास जगताप, समीर मोरे, अनिकेत गोरे, विक्रांत होरटे, विशाल करके, सुमित बोबडे, विशाल सूर्यवंशी, विजय कदम, साहिल भंडारी, ओम कांबळे, जयराम राजपूत, मल्लेश चलवादी, प्रशांत भंडारी, ज्योती गागडे, कांता हाके, मंगला शिनलकर, निशिगंधा थोरात, दीपक माने.
दीपक गायकवाड, छाया गदादे, योगीराज इंगळे, अशोक ढमढेरे, दिलीप लोणकर, रायबा गायकवाड, रामदास चांदगुडे, दत्तात्रय भंडारी आदींसह लाडक्या बहिणी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





