PMC Bank Scam: प्रवीण राऊतांची 72 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणी प्रवीण राऊत यांच्याबद्दल ईडीने 72 कोटींच्या मालमत्तेचा दावा करण्यात आला आहे.
एनएआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृतानुसार, ईडीने पीएमसी बॅंक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे 72 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे.
हा व्यवहार मनी लॉंड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जोडली आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. पण संजय राऊत यांनी ईडीकडे यासाठी मुदत मागितली होती.





