भाजपच्या विजयानिमित्त वंचित मुलांना ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट दाखविला
Updated On:

पुणे – लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती येत आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. भाजप जवळपास ३४० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्त साईनाथ सेवा मंडळातर्फे मंगला चित्रपटगृह येथे वंचित मुलांना मोदींचा बायोपिक दाखविला.
नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधानपदी रुजू होऊन राष्ट्रसेवा करणार आहेत. त्यानिमित्त साईनाथ सेवा मंडळाने वंचित मुलांसोबत विजयोत्सव साजरा केला. यावेळी मुलांनी मोदीचे मुखवटे परिधान केले होते. तसेच केक कापून जल्लोष करण्यात आला.








