PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आठवड्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर
Updated On:

PM Narendra Modi – देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरातील रे नगर येथे 365 एकर जागेवर या प्रकल्प उभारण्यात आला आहे.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत सुमारे 15 हजार तयार घरांचे वाटप करण्यात येणार आहे. ही घरे पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात आली आहेत.





